बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भाराताचा अमित पांगल इतिहास रचण्याच्या एक पाऊल मागे

0

एकातेरिनबर्ग (रशिया) : रशियात सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भाराताचा अमित पांगल इतिहास रचण्याच्या एक पाऊल मागे आहे. पांगलने स्पर्धेतील ५२ किलो वजनी गटात फायनल गाठली आहे. त्याने सेमी फायनलमध्ये कझाकिस्तानच्या साकेन बिबोस्निओव्हचा  ३-२ असा पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला आहे. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद  स्पर्धेत फायनमध्ये पोहचणारा तो भारताचा पहिला पुरुष खेळाडू आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये मनिष कौशिकला क्युबाच्या अँडी क्रुजकडून  ०-५ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे फायनल गाठून इतिहास रचण्याचे स्वप्न भंगले. ५२ किलो वजनी गटात फायनलमध्ये अमित पांगलचा मुकाबला उझबेकिस्तानच्या शाखोबिदीन झोइरोव्ह याच्यासोबत होणार आहे. हा सामना अमितने जिंकला तर जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून पुरुषांमधील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा इतिहास त्याच्या नावावर कोरला जाईल. शाखोबिदीन झोइरोव्हने फ्रान्सच्या बिलाल बेन्नामाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here