रत्नागिरी : आज दुपारी दीड च्या सुमारास उद्यमनगर जवळील ओसवाल नगर येथे तौसीफ गुहागरकर या तीस वर्षीय तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. तौसीफ नमाजासाठी जात असताना हि घटना घडली. हल्लेखोर तरुणाने तौसीफच्या मानेवर व हातावर धारधार शास्त्राने वार केले. जखमी तौसीफला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर तरुण आणि तौसीफ हे नोकरीनिमित्त सौदी येथे एकाच खोलीत रहात होते. तौसीफ सुट्टीवर तर हल्लेखोर तरुण नोकरी सोडून भारतात आला होता. सौदी येथे नोकरी करता असतानाच काही झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे. घटना घडताच रत्नागिरी पोलीस सतर्क झाले असून हल्लेखोराच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. तर पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी तौसीफ गुहागरकर या जखमी तरुणाची इस्पितळात जाऊन भेट घेतली आहे
