नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कंपनी कर कमी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी सरकारच्या या निणर्याबरोबर पीएम मोदी यांच्या अमेरिकेत होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमावरही ट्वीटरच्या माध्यमातुन टीका केली. देश आर्थिक दूरावस्थेत आहे हे या कार्यक्रमांद्नारे ते लपवुन ठेवु शकत नाहीत. HowdyIndianEconomy असा हॅशटॅग करून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की सातत्याने शेअर बाजाराचा आलेख घसरत आहे हे अतिशय चांगले काम आहे. १.४ लाख कोटी रूपये खर्चून होणारा ह्युस्टन इव्हेंट हा जगातील सर्वात महागडा कार्यक्रम आहे. पीएम मोदींनी ज्या आर्थिक संकटात भारताला आणले आहे ते कोणत्याही कार्यक्रमाच्या मागे लपवता येणार नाही. दरम्यान, जीएसटी परिषदेच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपनी कर कमी करण्याची घोषणा केली. कंपनी कर आणि इतर सवलती कमी करण्यासाठी तिजोरीवर १.४५ लाख कोटींचा भर पडणार आहे. या खर्चाचा राहुल गांधी यांनी संदर्भ दिला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेत ह्युस्टन येथे होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमावर टीका केली. मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थितीबाबत बोलावे, ‘मोदी जी, ‘हाउडी’ “Howdy” economy doin’, Mr Modi? (अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे)? या ठिकाणी ते चांगले दिसत नाही. मोदीसमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील ह्युस्टनमध्ये २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ५० हजार भारतीय अमेरिकन लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
