लांजा : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने लांजा बाजारपेठेत महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या टपऱ्या, पत्राशेड दुकाने व पक्क्या इमारती ही बांधकामे भुईसपाट करण्याची गुरुवारी दुसऱ्या दिवशीही मोहीम सुरू होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण्याच्या कामाने वेग घेतला असून गेल्या दोन वर्षांपासून लांजा शहरातील रेंगाळलेले काम आता सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात भूसंपादन केलेल्या जागेवरील अनधिकृत टपऱ्या, दुकाने हटविण्याच्या कामाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 18-Dec-20