अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या चौघांना अटक

0

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे विविध सार्वजनिक ठिकाणी गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चौघांवर सावर्डे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना मंगळवारी घडली. चंद्रकांत उर्फ छोटु जगन्नाथ जसवाल (वय ५४, रा. सावर्डे), स्वप्नील सूर्यकांत शिर्के (४०, रा. देवशेतवाडी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण त्रिमूर्ती गैरेजच्या मागे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ सेवन करताना आढळून आले होते. याची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील साळुखे यांनी सावर्डे पोलिसांना दिली. दुसऱ्या घटनेत सावर्डे पिंपळ मोहल्यांकडे जाणाऱ्या ब्रीजच्या खाली भुवाली कुमार मदनशहा गुप्ता (२७, रा. सावर्डे) व नीलेश महादेव पुरी (२७, रा. कुडप कातळवाडी) हे दोघेजण अंमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने त्यांनाही अटक केली आहे. याची फिर्याद हेडकॉन्स्टेबल दीपक करजवकर यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 18-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here