खेड : मी शिवसेनेत येण्याचा विचार करत असताना उद्धव ठाकरे जुन्या गोष्टी विसरले असतील का? हा प्रश्न मनात होता. परंतु त्यांची भेट झाल्यानंतर मला कळले की जे माझ्या मनात होत तसं काही नाही. मी तेव्हाच शिवसेनेत परतण्याचा निर्णय पक्का केला, असे भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या स्वागत मेळाव्यात बोलताना सांगितले .
शहरातील पाटीदार भवन येथे शिवसेनेच्यावतीने भास्कर जाधव यांच्या स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलत होते . भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडून जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेंव्हा त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली होती.
