भारत वि. ऑस्ट्रेलिया: भारताची भेदक बॉलिंग, ऑस्ट्रेलियावर इतिहासात पहिल्यांदाच ओढावली नामुष्की

0

अ‍ॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये डे-नाईट टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर बॉलर्सचं वर्चस्व होतं. भारतानं 6 आऊट 233 या धावसंख्येवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. भारताचे तळाचे फलंदाज फार काळ तग धरु शकले नाही. दुसऱ्या दिवशी अवघ्या 11 रन्सची भर घालून भारतीय टीम ऑल आऊट झाली.

दुखापतीचा सामना करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं या टेस्टमध्ये जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड ही नवी जोडी ओपनिंगला उतरवली होती. ऑस्ट्रेलियन बॅट्समन हे टेस्टमध्येही वेगवान खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच फॉर्मात असलेला T20 स्पेशालिस्ट मॅथ्यू वेड ओपनिंगला आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम वेगवान सुरुवात करेल असा सर्वांचा अंदाज होता. भारताच्या उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात करु दिली नाही. या दोघांनी अचूक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियन ओपनर्सला जखडून ठेवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिला रन घेण्यासाठी तब्बल 28 बॉल लागले. ऑस्ट्रेलियाची टेस्ट क्रिकेटमधील या शतकातील ही सर्वात संथ सुरुवात आहे.

भारतीय बॉलर्सनं केलेल्या दमदार सुरुवातीचा त्यांना लवकरच फायदा झाला. बुमराहनं आधी वेड आणि नंतर बर्न्सला आऊट करत ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. या दोघांनाही प्रत्येकी आठ रन काढले.

बॉलिंगमध्ये बुमराह आणि उमेश यादवसह मोहम्मद शमी ही भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात. गुलाबी बॉल आणि डे-नाईट टेस्ट यामुळे भारताच्या फास्ट बॉलर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवण्याची क्षमता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:54 PM 18-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here