‘टिम रत्नदुर्ग’ने केले निसर्गप्रेमी रत्नागिरीकरांच्या शंकेचे निरसन

0

रत्नागिरी : आपली रत्नागिरी ही अनेक कुतूहलाने, निसर्गाच्या निरनिराळ्या छटांनी निसर्गप्रेमींना साद घालत असते. तर आपणही या रत्नागिरीतील अनेक कुतूहलाचे गूढ जाणून घेण्यात उत्सुक असतो, त्यापैकी एक गूढ आहे ते म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्यावरून सहजपणे दिसणारी आणि लहानांपासून पासून वयोवृद्ध माणसां पर्यंत सगळ्यांचा आकर्षणाचा विषय असणारी समुद्रातील गुहा (केव्ह). गेली अनेक वर्षे रत्नदुर्ग माउंटेनिअर्स अनेक साहसी मोहीमा राबवत आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रेकवॉटरवॉल जवळील गुहेतील साहसी अनुभव सर्व सामान्य जनतेला व पर्यटकांना देणे, पण हा इव्हेंट अटपल्यावर बऱ्याच पर्यटकांचे कायम प्रश्न असायचे. हि गुहा त्या डोंगरावरून दिसणाऱ्या समुद्रातील गुहेला मिळते का? आपण तिथे गेला आहेत का? कोणी जाणकार ह्या त्या गुहे विषयी सांगू शकेल का? आणि हे सगळे प्रश्न ऐकून आम्ही ठोस असे काहीच सांगू शकत नव्हतो. कारण काही सांगत ही गुहा खूप आत जाते पण पाण्यामुळे आणि भरतीच्या भीतीने आम्ही मागे आलो, तर कोण सांगत असे आत गेल्यावर ऑक्सिजन कमी पडतो म्हणून आम्ही मागे आलो. त्यामुळे ठोस उत्तर शोधाण्यासाठी आपण आत जाऊन यायचेच हा निर्णय घेऊन आम्ही आत जाण्याचे ठरवले. या मोहिमे साठी गिर्यारोहणाचे अनुभव असणारे आणि पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास असणारे पट्टीचे पोहणारे असे आमचे मेंबर्स ही घेण्यात आले. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष वीरेंद्र वणजु यांच्या सोबत गणेश चौघुले, पपा सुर्वे, जितेंद्र शिंदे, गौतम बाष्टे, किशोर सावंत, शैलेश नार्वेकर, शेखर मुकादम, अक्षय चौघुले, ओंकार सावंत, हर्षल चौघुले, यश सावंत ही टीम 16/12/2020 या तारखेला या गुहेत प्रवेश करून शेवट पर्यंत जाऊन स्वतःच्या मानत असणाऱ्या अनेक प्रश्नांना उत्तरे शोधून ही मोहीम यशस्वी केली. गुहेत आत शिरताना उसळणाऱ्या लाटा, सतत बदलणारा प्रवाह, आणि हे सगळे करत असताना सतत दगडांवर(खडपांवर) आपटण्याची भीती या सगळ्याचा अतिशय बारकाईने गेला महिनाभर अभ्यास करून प्लॅन करण्यात आला, कोणी कुठे कुठल्या लाटेसोबत आत जायचे, कुठे थांबायचे, कोणी कधी आणि कसे बाहेर यायचे याचेही प्लॅनिंग करण्यात आले. दुपारी 2:30 ला सुरू झालेली मोहीम भरती-आहोटीचा टायमिंग मॅच करत आत जाण्याआधीच सगळेजण किती वाजता पाण्याबाहेर हवे आहेत हे ठरवण्यात आले होते. त्या प्रमाणे सगळे मेंबर्स 5:30 ला सुरक्षित गुहे बाहेर आले. बाहेरून भव्य दिसणाऱ्या या गुहेचा शेवट जास्ती आत नसून 200 फुटांवरच आहे, ही गुहा मानव निर्मित नसून निसर्ग निर्मित आहे असा निकष काढण्यात आला. निसर्गाने आणि या समुद्राने आजही आम्हाला भरभरून साथ दिल्याचे जाणवले कारण शेवटचा मेम्बर बाहेर आल्यावर मात्र लाटा आम्हाला गुहे बाहेरील दगडांवर उभे राहण्यास देत नव्हता. बघता बघता पाणी वाढू लागले. गुहा 200 फुटच असली तरी आपटणाऱ्या लाटां मुळे सगळ्यांची चांगलीच दमछाक झाली होती पण काहीतरी आज वेगळे केल्याचा आंनद ही तितकाच मोलाचा होता, असे मत टिम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गौतम बाष्टे यांनी व्यक्त केले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here