बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यास भोस्ते ग्रा. पं. कडून टाळटाळ

0

खेड : तालुक्यातील भोस्ते ग्रामपंचायत कार्यक्षेत्र मध्ये सुमारे ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूक करून उभारण्यात आलेल्या इमारतीची योग्य कागदपत्रे असताना देखील बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यास गेली २ वर्ष टाळाटाळ केली जात असल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकावर घर दार विकण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. या प्रकरणी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. भोस्ते ग्रा. प. च्या हद्दीत चौधरी नामक मुंबई स्थित बांधकाम विकासकाने इमारत उभी केली मात्र गेल्या २ वर्षा पासून इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्या साठी ग्रा. पं. कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील दाखला न देता मनमानी कारभार सुरू ठेवला त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या बांधकाम विकासकाने आत्मघातकी पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. या बाबतची माहिती मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे अरबाज बडे याना मिळाल्या नंतर त्यांनी त्या विकासकाला आत्महत्या पासून ‘परावृत्त’ करत संबंधित ग्रा प ची २ वेळा भेट घेतली मात्र दाखला न देण्याच्या भूमिकेवर ग्रा प ठाम आहे. दरम्यान, या प्रकरणी येथील न्याय दंडाधिकारी तथा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या कडे विकासक चौधरी यांनी निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली होती त्यानुसार तहसीलदार घोरपडे यांनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत अहवाल सादर करून दाखला देण्याची सूचना करण्यात आली होती मात्र या आदेशाला देखील ग्रा प ने केराची टोपली दाखवली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत शनिवारपर्यत याबाबत बांधकाम पूर्णत्वचा दाखला न दिला गेल्यास आमरण उपोषण चा इशारा मानवा धिकार संघटनेचे किरण तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here