पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रतन टाटांचा गौरव

0

नवी दिल्ली : देशाच्या औद्योगिक जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्ल्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘असोचेम’ या औद्योगिक संघटनेचा शतक महोत्सवी स्थापना सप्ताह समारोह आज पार पडला. आभासी पद्धतीने सुरु असलेल्या या सोहळ्यात टाटा यांना गौरवण्यात आले. यावेळी असोचेमचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, डॉ. दीपक सूद, नियोजित अध्यक्ष विनीत अगरवाल, बाळकृष्ण गोएंका, बाबा कल्याणी, टाटा सन्सचे अध्यक्ष टी. चन्द्रशेखरन आणि सत्कारमूर्ती रतन टाटा यांच्यासह अनेक बडे उद्योजक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here