प्रख्यात हिंदी अभ्यासक कै.डॉ. गजानन सुर्वे यांची 3000 पुस्तकांची ग्रंथसंपदा गोगटे कॉलेजला देणगी

0

रत्नागिरी : डॉ. गजानन शंकर सुर्वे माजी प्रोफेसर तसेच अध्यक्ष, हिंदी विभाग, लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा परंतु मूळ रत्नागिरीचे असणाऱ्या सुर्वे सरांचे मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली त्याचे संशोधनग्रंथ आणि तेरा एमफील संशोधन ग्रंथ चार प्रकाशीत पुस्तके आज त्यांचे विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापक, लेखक आहेत. पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथाचा हिंदी अनुवाद डॉ. गजानन सुर्वे यांनी केला व तो भारताचे माजी राष्ट्रपती महामहीम डॉ.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते प्रकाशित झाला. संदर्भ पुस्तके अश्या साधारण 3000 पुस्तकांची ग्रंथ संपदा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबूराव जोशी ग्रंथालयाला देणगी म्हणून देण्यात आली. देणगी देणाऱ्या कै. डॉ.गजानन शंकर सुर्वे यांची मुलगी डॉ. कामयानी सुर्वे स्वतः पिंपरी चिंचवड पुणे येथे रयत संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत, सदर देणगी दिल्यानंतर अतिशय समाधान व्यक्त केले की, माझ्या बाबांची ग्रंथ संपदा अतिशय नावाजलेल्या कॉलेजमध्ये देत आहे. सदर देणगी देण्यासाठी पद्यभूषण धनंजय किर यांचे नातू डॉ. शिवदीप किर यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.आनंद आंबेकर यांच्याशी समन्वय साधल्यानंतर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या पुढाकाराने सदर ग्रंथ संपदा देणगी कार्यक्रम यशस्वी पार पडला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी असे मत व्यक्त केले की सदर ग्रंथ संपदेमुळे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संशोधन विभागाला शैक्षणिक कार्यात खुप मोठी मदत होणार आहे. सदर कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, माजी सह कार्यवाह नथुराम देवळेकर, संचालक मनोज पाटणकर, प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, डॉ.आनंद आंबेकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here