प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार

0

रत्नागिरी : मालेगाव (जि. नाशिक) येथील आई प्रतिष्ठानचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार गुहागर येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या पिपिलिका मुक्तिधाम या कादंबरीला जाहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. त्यापैकी अण्णा भाऊ साठे पुरस्कारासाठी श्री. लबडे यांची निवड झाली आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते श्री. लबडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, आई प्रतिष्ठानच्याच कुसुमाग्रज काव्य पुरस्कारासाठी कणकवली येथील प्रा. डॉ. नामदेव गवळी यांच्या भातालय या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:32 PM 19-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here