रत्नागिरी : तालुक्यातील कापडगाव येथे बेकायदा गावठी हातभट्टीची 12 लिटर दारू बाळगल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी 5.30 वा. सुमारास करण्यात आली. विष्णू विश्राम कुरतडकर (65,रा. कापडगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी घराशेजारी 600 रुपयांची 12 लिटर दारू बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजवैद्य करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 21-Dec-20