विधानसभा निवडणुकांमधील उमेदवारांसाठीही एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना

0

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणूक 2019 साठी राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या लेखी तरतुदीनुसार व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 28 अ, 159 व 134 मधील तरतुदींचा वापर करून  तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विविध परवानग्यांसाठी राजकीय पक्ष, उमेदवार यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तर एकाच ठिकाणी परवानग्या मिळतील व वेळेचीही बचत होणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवार यांना या एकाच खिडकीवर मिळणार्‍या विविध परवानग्या पुढीलप्रमाणे आहेत. चौक सभा, सर्व प्रकारच्या जाहीर सभा, पोस्टर्स, झेंडे, बॅनर इ. सभेच्या ठिकाणी लावणे, खासगी जागेवर जाहिरात फलक, प्रचार वाहन परवानगी, 269-कुडाळ विधानसभा मतदारसंघ कार्यकक्षेसाठी, प्रचार कार्यालय परवानगी, हेलीपॅडवर हेलिकॉप्टर उतरवणे, ध्वनिक्षेपकाची परवानगी, मिळवणूक व रोड शो, केबल जाहिरात परवानगी या सर्व परवानग्या सकाळी 10.30  ते सायं. 4.00 या कालावधीत मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here