ऑनलाइन मोबाईल खरेदी करणाऱ्याला 51 हजारांचा गंडा

0

खेड : ऑनलाईन मोबाईल खरेदी करणाऱ्या खेड येथील एका खरेदीदाराला चांगलेच महागात पडले आहे. ‘बाय माय मोबाईल’ या वेबसाईटवरून मोबाईल विकण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याने विजय पवार नामक खरेदीदाराला 51 हजार रुपयांचा चुना लावला आहे. या ऑनलाईन फसवणुकीबाबत विजय पवार यांनी अज्ञात भामट्याच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवार यांनी मोबाईल खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय निवडला होता. या दरम्यान त्यांना ‘बाय माय मोबाईल’ या कंपनीच्या वेबसाईटवर चांगले मोबाईल दिसले. त्यांनी मोबाईल खरेदीसाठी डाऊन पेमेंट म्हणून 4199/- रुपयांचा भरणा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना एक लिंक पाठवली आणि त्या लिंक वरील फॉर्म भरण्यास सांगितले. पवार यांनी त्याप्रमाणे फॉर्म भरून पाठवल्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय व बँक ऑफ इंडिया या दोन बँकाच्या खात्यातून सेहेचाळीस हजार रुपये त्या इसमाने परस्पर काढून घेतले. या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 21-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here