गुहागर समुद्रात अडकलेल्या आठ पर्यटकांना जीवरक्षकाने वाचविले

0

वरवेली : गुहागर किनारी समुद्रात जलसफरीचा आनंद लुटणाऱ्या आठ पर्यटकांना गुहागर नगर पंचायतीचे जीवरक्षक प्रदेश तांडेल यांनी पाण्याबाहेर काढले आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील आठजण बनाना राईड मारण्यासाठी पाण्यात उतरले होते. बनाना राईट मारण्यासाठी असलेल्या जेट्सकीममध्ये रस्सी अडकून जेट्सकी आत पाण्यात गेल्यावर बंद पडली. त्यामुळे चालवणाऱ्या बरोबरच बनानावर बसलेल्या आठजण घाबरले. आता किनाऱ्यावर जायचे कसे, असा प्रश्न जेट्सकी चालवणाऱ्याला पडला असताना त्याने किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम पाहणाऱ्या असगोली येथील प्रदेश तांडेल याला वाचवण्याचा इशारा केला. तांडेल यानी कोणताही विचार न करता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू बोर्डसह तातडीने समुद्रात धाव घेतली. किनाऱ्यावर सुखरूप आलेल्या पर्यटकांनी तांडेल यांचे आभार मानले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 22-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here