शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात रायगड किल्ल्यावरुन

0

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा आज (दि. २१) रायगड येथे पोहचली आहे. रायगड जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेची सुरुवाच रायगड किल्ल्यावरुन झाली. यात्रेत सहभागी असलेल्या मान्यवरांनी रायगडावरील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. सुनील तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदितीताई तटकरे अमोल मिटकरी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकनकर उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणुकांची चाहुल लागताच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यामुळे पक्षात मोठ्याप्रमाणावर पडझड झाली आहे. त्यामुळे राज्यभर काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे नेहमीचे दिसणारे चेहरे गायब आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला उभारी देण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन उर्जा देण्यात येत आहे. त्यातच आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने आता उमेदवार औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात करतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक प्रचाराची सुरुवात रायगडावरुन होणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here