राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरता येणार

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं, असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं सरळ डेटा बेसमध्ये 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील. दरम्यान, राज्यात कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामुळे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही परीक्षा मंडळानं सुचना दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:28 PM 22-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here