मुंबई : बीसीसीआय दिव्यांग क्रिकेटपटूंना पहिली टी-20 शारीरिक दिव्यांग वर्ल्ड क्रिकेट सीरिज किताब जिंकल्यानंतर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे प्रशासकीय समितीच्या (सीओए) सदस्य डायना एडुल्जी यांनी सांगितले. किताबाचा दावेदार असलेल्या भारताने यावर्षी ऑगस्टमध्ये यजमान इंग्लंड संघाला 36 धावांनी नमवून जेतेपद मिळवले. मुंबईमध्ये बीकेसीच्या एमसीए क्लबमध्ये दिव्यांग संघाचे सदस्य आणि सहयोगी स्टाफ यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये एडुल्जी यांनी उपस्थिती लावली होती. दिव्यांग क्रिकेटपटूंना आमच्या घटनेंतर्गत घेतले आहे. त्यामुळे ते आता बीसीसीआयचा भाग आहेत. आम्ही सर्व खेळाडूंना सन्मानित करीत आहोत. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफ व संघटनेलादेखील मदत मिळावी, असा आग्रह करण्यात आला होता. ही तर सुरुवात आहे. चांगले खेळा व विजय मिळवत राहा, असे एडुल्जी यांनी सांगितले.
