जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया व रवी कुमार दहियाला कांस्यपदके

0

नूर सुल्तान (कझाकिस्तान) : जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताचे स्टार मल्ल बजरंग पुनिया याने 65 किलो फ्री स्टाईल गटात तर रवी कुमार दहिया याने 57 किलो फ्री स्टाईलमध्ये कांस्यपदके मिळवली. बजरंगने मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिर याला 8-7 असे हरवले. बजरंगचे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील हे तिसरे पदक असून, 2013 साली त्याने पहिले कांस्य तर 2018 साली त्याने रौप्यपदक जिंकले आहे. रविकुमारने इराणच्या रिझा अत्री नघारची याला 6-3 अशा गुणांनी पराभूत केले.तत्पूर्वी, 74 किलो गटात भारताच्या सुशीलकुमारला मात्र पहिल्याच फेरीत अपयश आले.  बजरंगला गुरुवारी उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले होते. या लढतीत दोन्ही मल्लांनी 9-9 असे समान गुण मिळवले होते. परंतु पंचांनी स्थानिक पैलवान नियाजला झुकते माप देत त्याला विजयी घोषित केले. या सामन्यातून बजरंगला ऑलिम्पिकचे तिकीट मात्र मिळवण्यात यश आले. पण पदकाची भरपाई त्याने शुक्रवारी केली. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here