मागणीनुसार टँकर देण्याच्या आ. शेखर निकम यांच्या सुचना

0

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाणी टंचाई आराखड्यात समावेश नसतानाही गाव किंवा वाडीने टँकरची मागणी केल्यास टँकरने पाणी पुरवण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत दिल्या. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, सभापती सुजित महाडिक, उपसभापती प्रेरणा कानाल, तालुक्यातील सर्व जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यात अनेक गावांनी टँकर, काही योजना तसेच असलेल्या योजनांची दुरुस्ती सूचविण्यात आली. याबाबत आमदार निकम यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:10 PM 23-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here