रत्नागिरी : निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी आवश्यक बीज पुरवठा करण्यासाठी कोळंबी बीज उत्पादन केंद्रांची आवश्यकता कोकणात होती. ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक लघू आणि दोन मोठे अशा सात कोळंबी बीज संवर्धन केंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकणात कोळंबी या नगदी मत्स्य उत्पादनासाठी पैदास केंद्रांची वानवा होती. गेले अनेक वर्षे यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यामळे कोळंबी बिजासाठी कर्नाटक अथवा केरळ राज्यावर अवलंबून रहावे लागत होते. मात्र आता या साठी झालेली उपेक्षा संपष्टात आली आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक मिनी कोळंबी बीज संवर्धन आणि पाचही जिल्ह्यांसाठी पालघर आणि रायगड येथे दोन मोठी केंद्र प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या केंद्रांना मान्यता दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आयात करावी लागणारी कोळंबी बीज या केंद्राच्या निर्मितीने कोकणातून निर्यातीकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
