संगमेश्वर तालुक्यातील कोंडउमरेत घरफोडी; अज्ञातावर गुन्हा

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडउमरे येथील बंद घर फोडून अज्ञाताने रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चांदीची भांडी चोरल्याचे दिसून आले आहे. यानुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील प्रवीण जाधव हे मुंबई येथे नोकरी निमित्ताने वास्तव्याला आहेत. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ही बाब शेजारी असलेल्या भिकाजी कदम यांना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. यानुसार कदम यांनी घटनेची माहिती प्रवीण जाधव यांना दूरध्वनीवरून कळविली. जाधव यांनी कदम यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी कोंडउमरे येथील जाधव यांच्या घराची पाहणी केली असता जुन्या कपाटाचा मुख्य दरवाजाच तोडून फेकलेला दिसून आला. याचबरोबर कपडे व महत्त्वाचे कागदपत्र इतरत्र फेकलेले दिसून आले. घराचे मालक नसल्यामुळे नेमका कोणता ऐवज चोरीस गेला आहे हे पोलिसांना कळून आले नाही. अखेर गुरुवारी दुपारी प्रवीण जाधव यांनी घरी येऊन पाहणी केली असता, गोदरेज कपाटातील साडेचार हजारांची रोख रक्कम, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचा करंडा, गणेश मुर्ती व ताम्हन चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आले.यानुसार जाधव यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. यानुसार रात्री उशिरा पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उयाच घराच्या शेजारी असलेल्या राजाराम पवार यांचा बंगला देखील अज्ञातांनी फोडल्याचे दिसून आले आहे. राजाराम पवार देखील मुंबई येथे वास्तव्याला आहेत. यामुळे त्यांच्या घरातीलचोरीस गेलेल्या वस्तूंचीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

IMG-20220514-WA0009LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here