वरवडेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे-खारवीवाडा येथील तरुणाने आई सकाळी कामावर गेल्यानंतर किचनमध्ये छताच्या वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित शंकर पालशेतकर (वय २२, रा. खारवीवाडावरवडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. गळफास लावलेल्या स्थितीत अमित आढळल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला खाली उतरवून तत्काळ मालगुंड आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या आत्महत्येबाबतचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 24-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here