दापोली न. पं. करणार मोकाट जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई

0

दापोली : दापोली शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे दापोली नगर पंचायतीची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत लवकरच या मोकाट जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे दापोली नगरपंचायतीकडून सांगण्यात आले. या मोकाट जनावरांमुळे रोजच दापोली शहरात अपघाताचे प्रसंग घडत आहेत. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मोकाट जनावरांच्या उपद्रवात दापोली नगर पंचायतीचे काही विद्यमान नगरसेवक देखील जखमी झाले आहेत. या जनावरांतील बहुतांशी जनावरे ही दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्राबाहेरील असून दापोली नगरपंचायतीचे विशेष पथक या मोकाट जनावरांना दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्राबाहेर सोडणार आहेत. ही जनावरे दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्रात आली तर त्यांना गोशाळेत पाठविण्याचा निर्णय दापोली नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यात काही गोशाळा असून यातील दोन गोशाळा चालवणाऱ्या संस्थेने दापोली शहरातील मोकाट जनावरांची सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे ज्या कोणाची जनावरे मोकाट असतील अशा मालकांनी आपली जनावरे ताब्यात घ्यावीत, असे आवाहन दापोली नगर पंचायतीकडून करण्यात येत आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here