युरोपहून आलेल्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारकडून एसओपी जारी

0

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिनिंग अगेन अंतर्गत नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार युरोप, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर करोनाची RTPCR टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. तर निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशाला सात दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

अध्यादेशात नेमकं काय?

◼️ राज्यात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन राहावं लागेल.

◼️ पाचव्या आणि सातव्या दिवशी RTPCR टेस्ट केली जाईल.

◼️ रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास 7 दिवसात सोडणार, मात्र घरात सात दिवस क्वारंटाईन राहावं लागेल.

◼️ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड हॉस्पिटलमध्ये 17 दिवस भरती

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:08 PM 24-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here