मुख्यमंत्री पदाची खुर्ची आरक्षित, शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावरुन चिमटा

0

मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांच्या विधानसाभा निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष आपलाच विजय होणार असे म्हणत आहे. तर राज्यात आचारसंहिता लागू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार असे सुतोवाच केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची आरक्षित आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावरुन चिमटा काढला. मुख्यमंत्र्यांनी भाजप सेना युती ही होईल, युतीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू असुन लवकरच निर्णय सांगितला जाईल असे सांगत युती तुटणार असल्याची शक्यता खोडून काढली. त्यांनी शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री पदाची खुर्ची आरक्षित आहे. पण, सेनेने उपमुख्यमंत्री पदाचा विचार करावा असे वक्तव्य केले. सध्या राज्यातील राजकिय वातावरण चांगले तापले असून सर्वच राजकिय पक्ष आपआपल्या जागावाटपावरून रस्सी खेच करताना दिसत आहेत. भाजप सेनेतही जागावाटपावरून युतीबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. सध्या शिवसेना भाजपकडे विधानसभा लढविण्यासाठी लोकसभेला ठरलेल्या फॉरम्युला प्रमाणे निम्या निम्या जागांची मागणी करत होती. पण आता १२६ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागेल असेच चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला १६२ जागा मिळतील. त्याचबरोबर भाजप आपल्या कोट्यातील जागा मित्रपक्षांना सोडेल असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. एकिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि पुन्हा आपणच मुख्यमंत्री होऊ, असे सांगत असले तरी काँग्रेसने भाजपचे हे सरकार पुन्हा येणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी, राज्यातील शेतकरी हा त्रासला आहे, तो चिंतेत आहे, विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्येचे हे चित्र फार विक्राळ आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग राज्यात बदल होण्याची वाट पाहत आहे. तर हरियाणामध्ये न्याय व्यवस्था संपलेली आहे. तेथेही लोक भाजपला कंटळाले असून ते भाजपला बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या तयारीत आहेत. असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here