प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं आज वाटप

0

◼️ पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येत्या काही तासांतच वर्ग करणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here