मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक

0

रत्नागिरी : मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर होणाऱ्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या आराखड्याबाबत शनिवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बंधाऱ्यासाठी १९० कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. नवीन दत्त मंदिरात भाटीमिऱ्या येथे ११ वाजता ही बैठक आहे. त्यामध्ये सहा वाड्यांच्या ग्रामस्थांना संबंधित खात्याचे अधिकारी, अभियंता सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या बंधाऱ्याचे काम दर्जेदार व्हावे, या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा सुमारे साडेतीन किमीचा आहे. पावसाळ्यामध्ये या बंधाऱ्याची समुद्राच्या अजस्र लाटांमुळे धूप होते. बंधाऱ्याला भगदाड पडून किंवा बंधारा वाहून जाऊन पाणी मानवी वस्तीत शिरण्याची भिती निर्माण होते. यावेळी तर समुद्र रहिवाशांच्या कंपाउंडपर्यंत येऊन पोहचला आहे. कंपाउंड आणि लगतची नारळाची झाडे समुद्राने गिळंकृत केली आहेत. दर पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाते. परंतु लाखोंचा हा खर्च पाण्यात जातो. म्हणून कायमस्वरूपी उपाय करून पक्का बंधारा बांधण्याची ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून १९० कोटी रुपये मंजूर झाल्याचे आमदार उदय सामंत यांनी यापूर्वी स्पष्ट केले. टेट्रापॉड टाकून, पर्यटनाच्यादृष्टीने काही करता येईल, असा विचार सुरू आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर तो बांधावा, अशी मागणी आहे.  शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करणार आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम दर्जेदार असावे, अशी मागणी आहे. तसेच नेमका बंधारा कसा आहे, हे स्थानिकांना कळावे, यासाठी ही बैठक लावण्यात आल्याची माहिती बंधारा संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

HTML tutorial



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here