रत्नागिरी : वेडसर महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातून संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अशोक भिकाजी सावंत असे निर्दोष मुक्तता झालेल्या संशयितांचे नाव आहे. तालुक्यातील कोंडवी-चांदराई येथे राहणाऱ्या अशोक भिकाजी सावंत याने एका वेडसर महिलेला घरी नेऊन तिला पाच दिवस घरी ठेवले होते. त्यावेळी तिच्यावर त्याने बलात्कार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अशोक भिकाजी सावंत यांच्या विरोधात भा. दं. वि.क ३७६,३७६(२),(जे),(एन) अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने अशोक भिकाजी सावंत यांची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सावंत यांच्यावतीने अॅड. आदेश चवंडे, अॅड. विवेक दुबे, अँड. अनुराग पंडित, अॅड. श्रद्धा कांबळे यांनी कामकाज पाहिले.
