तेजस उद्धव ठाकरे यांचे नवे संशोधन, अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ ‘चन्ना स्नेकहेड’ माशाचा शोध

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे हे दऱ्या-खोऱ्यात जाऊन संशोधन करत असतात. त्यांना नवनवीन गोष्टींचा शोध लावण्याची आवड आहे. तेजस ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री पर्वतरांगांत केलेल्या संशोधनात अनेक प्रजातींचा शोध लावला आहे. आता त्यांनी मेघालयातील खासी टेकड्यांतून दुर्मिळ असा चन्ना स्नेकहेड या माशाचा शोध लावला आहे. निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्य़ा तेजस ठाकरे यांनी मेघालयातील खासी टेकडय़ांतून अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ हा मासा शोधला आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली आहे. या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध तयार करून त्यांनी तो अमेरिकेतील ‘कोपिया – अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ला पाठवला. हे संशोधन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. मेघालयातील या संशोधनात त्यांच्यासह जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलीथरन आणि एम. बँकीट हे संशोधकही सहभागी झाले. मेघालयातील डोंगर कपाऱ्य़ा, टेकडय़ा पिंजून काढताना त्यांना या अत्यंत सुंदर अशा दुर्मिळ माशाचा शोध लागला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here