जागितीत कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दीपक पुनियाचा विजय

0

नवी दिल्ली : जागितीत कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्याने ८६ किलो वजनी गटात कोलंबियाचा कार्लोस मेंडेझचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. या सामन्यात दीपकने कार्लोसचा ७-६ असा पराभव केला. या विजयाबरोबरच दीपक पुनिया हा टोकियो ऑलिम्पिकमधील आपले स्थान पक्के करणारा चौथा पैलवान ठरला आहे. दीपकचा उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टिफन रेचमुथ याच्याशी सामना होणार आहे. पण राहुल आवारेला ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जॉर्जियाच्या लोमटाडझेने त्याचा ६-१० असा पराभव केला. भारताच्या विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांच्यानंतर आज दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारत आपले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. पण, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला पराभवास सामोरे जावे लागले. ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीतील सामन्यात जॉर्जियाच्या लोमटाडझेने धडाकेबाज सुरुवात करत राहुलवर ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर राहुल आवारेने झुंजार खेळी करत ६-८ असा गुणातील फरक कमी केला. पण, अखेर लोमटाडझेने सामना ६-१० असा पराभव केला. आता रविवारी  राहुल आवारे कांस्य पदकासाठी खेळणार आहे. 

HTML tutorial


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here