कोदवली येथे पूर्ववैमनस्यातून महिलेला मारहाण

0

राजापूर : शहरालगतच्या कोदवली येथे पूर्ववैमनस्यातून एकाने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रवींद्र मांडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयराम धनू मांडवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम मांडवे हे रती मांडवे यांना सातत्याने त्रास देत असतात. बुधवारी याच रागातून जयराम यांनी रती यांना शिविगाळ व दमदाटी करत दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी जयराम विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास हेड कांस्टेबल पाटील करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:06 PM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here