मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक कार्यक्रम जाहीर, यंदा उन्हाळी सुट्टीवर कात्री

0

मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांसाठी विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यापीठ संलग्नित कॉलेजांमध्ये येत्या नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू केला जाणार आहे. यासाठी कॉलेजांची तयारी पूर्ण झाली असून दुसऱ्या सत्रात ही ऑनलाइन लेक्चरद्वारेचे विद्यार्थ्यांची वर्ग भरणार आहेत. विशेष म्हणजे या वेळापत्रकानुसार यंदा कॉलेजांतील विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत कपात होणार असून विद्यार्थ्यांना अवघ्या 13 दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वच कॉलेजांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाकडे सर्व कॉलेजांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुंबई विद्यापीठाने नुकताच आपल्या शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केला आहे. आर्टस्, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ज्यात कॉलेजांनी त्यांचे पहिले सत्र 7 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरे सत्र 1 जानेवारी 2021 ते 31 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केला असला तरी त्यात परीक्षेसंदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे परीक्षा कधी घ्याव्यात आणि त्याची तयारी कशी करावी याबद्दल कॉलेजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

असे आहे वेळापत्रक :
पहिले सत्र – 7 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020
दुसरे सत्र – 1 जानेवारी ते 31 मे 2021
उन्हाळी सुट्टी – 1 जून ते 13 जून 2021
1 जानेवारीपासून कॉलेजांची दुसऱ्या सत्रातील ऑनलाइन लेक्चर सुरू करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:48 PM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here