सांगलीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी खेडमध्ये गजाआड

0

खेड : सांगली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या फरारी संशयित आरोपीला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून भरणे परिसरातून ताब्यात घेतले आहे. विकी ऊर्फ विकास हनुमंत जाधव-गोसावी असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला शोधण्यासाठी सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग प्रयत्न करीत असतानाच तो खेडमधील भरणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खेड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुजित गडदे व कर्मचारी विनय पाटील यांना पोलिस यंत्रणेने संशयित आरोपीबाबत माहिती दिली. त्यांनी भरणे परिसरात संशयित आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले. दरम्यान, पकडल्यानंतर त्याला खेड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सांगली एलसीबीचे एक पथक संशयित आरोपी विकी याला ताब्यात घेण्यासाठी निघाले असून सायंकाळी उशिरा त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 26-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here