रिफायनरीला आता एक इंचदेखील जमीन देणार नाही; खा. राऊत

0

राजापूर : यापूर्वी ज्या रिफायनरीचे श्राद्ध घालण्यात आले त्या प्रकल्पाचे भूत पुन्हा उकरण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, शिवसेना अजिबात गप्प बसणार नाही. सौदीचा राजपुत्र आणि प्रकल्पाच्या दलालांसाठी जर शासनाला हा प्रकल्प पुन्हा आमच्या जनतेच्या माथी मारायचा असेल तर आम्ही अजिबात गप्प राहणार नाही. रद्द झालेल्या रिफायनरीला आता एक इंचदेखील जमीन देणार नाही. शिवसेना प्रकल्पग्रस्त जनतेसमवेत राहील, असा इशारा शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी तारळ येथे प्रकल्पविरोधी सभेत दिला. मागील काही वर्षांत कोकणातील रखडलेले सिंचन प्रकल्प असतील किंवा अन्य विकासाची कामे अपूर्ण आहेत आंब्याला, काजूला योग्य हमीभाव नाही. मच्छीचा दुष्काळ असताना तो जाहीर केलेला नाही, याकडे अजिबात लक्ष न देणार्‍या शासनाला मात्र  रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याची जोरदार घाई झाली आहे. कारण हा प्रकल्प जनहितासाठी नाही तर सौदीच्या राजकुमाराच्या हितासाठी व प्रकल्पाचे दलाल यांचे खिसे भरण्यासाठी  शासनाला मार्गी लावायचा आहे, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला. मात्र शिवसेना शासनाचा तो प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय  आम्ही रहाणार नाही. येथील भुमिपुत्रांना पाठिशी सेना ठामपणे उभी राहील व त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्य्थ बसणार नाही, असा इशारा खा. राऊत यांनी दिला. सिंधुदुर्गमधील एका नेत्याने  सुमारे तीनशे एकर जमीन या प्रकल्प परिसरात खरेदी केली आहे. हा प्रकल्प जर रद्द झाला तर आपले काय होणार? यामुळे त्या नेत्याची तडफड सुरू आहे, असा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला. यावेळी आमदार राजन साळवी यांनी शासनाच्या धोरणावर प्रखर टीका केली. रिफायनरी प्रकल्प शिवसेनेने रद्द शासनाला रद्द करायला भाग पाडले आता या प्रकल्पासाठी एक इंच देखील जमीन मिळणार नाही. हे शासनाने लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.  यावेळी प्रकल्प विरोधी लढ्याचे स्थानिक नेते नंदु कुलकर्णी, भाई सामंत, संजय राणे आदींनी मार्गदर्शन केले. या सभेला सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती अभिजीत तेली, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, सोनाली ठुकरुल, कल्पना मोंडे, कमलाकर कदम, मज्जीद भाटकर यासहित सेनेचे व प्रकल्प विरोधी संघटनेचे  पदाधिकारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here