महिलाच रत्नागिरीचा आमदार ठरवणार

0

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही निवडणुकीची तयारी वेगाने सुरु झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात 314 तर संगमेश्‍वरमध्ये 31 अशी 345 मतदार केंद्रे असून 4 सहाय्यकारी केंद्र रद्द करण्यात आल्याची माहिती 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी दिली. या मतदार संघात महिला मतदार सर्वाधिक असल्याने, त्याच रत्नागिरीचा आमदार ठरवणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात एकूण मतदार  2 लाख 81हजार 587 एवढी असून त्यापैकी पुरुष मतदार संख्या 1लाख 37 हजार 493, स्त्री मतदार  1लाख 44 हजार 085 व तृतीयपंथी मतदारांची संख्या  9 आहे. जिल्ह्यात 50 सैनिक मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी व खासगी ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या नावाने फलक आहेत ते हटविण्याचे आदेश सर्व कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 दरम्यान एकूण 345 मतदान केंद्रे व 5 सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण 350 मतदान केंद्रे होती. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांमध्ये सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. पाच सहाय्यकारी मतदान केंद्रांपैकी 4 सहाय्यकारी मतदान केंद्रे रद्द करण्यात आली असून रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी नगर पालिका हद्दीतील दामले विद्यालय मतदान केंद्र क्रमांक 172 मध्ये 1555 मतदार संख्या असल्याने 172 अ हे दामले विद्यालयात तयार करण्यात आले आहे. 1555 मतदारांपैकी मूळ मतदान केंद्रामध्ये 1 ते 898 मतदार व सहाय्यकारी मतदान केंद्रामध्ये उर्वरिीत 899 ते 1555 मतदार अशी मतदार विभागणी विभागणी करण्यात आली आहे. केंद्र क्रमांक 3-जयगड येथील बंदर निरीक्षक जयगड कार्यालय येथून स्थलांतर करुन जि.प.पूर्ण उर्दू शाळा,जयगड अंगणवाडी खोली येथे उभारण्यात आले आहे. 2) 267- सोमेश्वर येथील जि.प.पु.प्रा.उर्दु शाळा सोमेश्वर येथून स्थलांतर करुन जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सोमेश्वर मराठी, नवीन इमारत येथे उभारण्यात आले आहे. 177 क्रमांकाचे वॉर्ड. 5मधील स्टेडियम गॅलरी पूर्वेकडील हॉल येथून स्टेडियमच्या पश्‍चिम गॅलरी हॉलमध्ये उभारण्यात आले आहे. विधानसभेसाठी निवडणूक विभागाकडून मतदानाच्या साहित्याचे वाटप व मतमोजणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथे करण्यात येणार आहे. या मतदारसंघातील सर्व राजकीय पक्ष व  उमेदवारांना निवडणुकीबाबत आवश्य असणार्‍या सभा, रॅलीचे परवाना एकाच खिडकीवर मिळणार आहे. दिव्यांग मतदारांनाही लोकसभेप्रमाणेच व्हिलचेअर व वाहने पुरविण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 21 सप्टेंबरपासून वाटद-खंडाळा, भाट्ये, हातखंबा या तीन ठिकाणी पोलीस सुरक्षा पथक तैनात राहणार असल्याचेही डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. या निवडणुकीच्या कामासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शशिकांत जाधव, अप्पर तहसीलदार अमोल पाठक, तहसीलदार श्रीम. मठकर हे सहाय्य करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here