जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे गठन

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभागाचे दिनांक 31ऑक्टोबर 2019 च्या शासन निर्णयानुसार जिल्हातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे, आई-वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणसाठी शासनाने दिलेल्या आदेशाची जिल्हा स्तरावर प्रभावी तथा समन्वयीत अंमलबजावणीसाठी आणि सल्ला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती गठीत करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या दालनात दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला. या समितीत जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे शिवाय ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी म्हणून रत्नागिरी शहर शाखेचे अध्यक्ष सुभाष थरवळ व चिपळूण जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष उस्मान बांगी यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाबतचे आदेश सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी यांनी दिनांक 16 डिसेम्बर2020 रोजी निर्गमित केले आहेत.या नियुक्ती बाबत रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्व्य समितीकडुन स्वागत करण्यात आले असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न लवकर सुटण्यास मदत होइल अशी आशा व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 26-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here