डॉ. सुनील सावंत यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनातून जागतिक स्तरावर मोहर उमटवली

0

देवरूख : देवरूखनजीकच्या माळवाशी या खेडेगावात जन्म व शिक्षण घेतलेल्या डॉ. सुनील सावंत यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनातून जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे. 20 सप्टेंबरदरम्यान बँकॉक-थायलंड येथे झालेल्या 21 व्या जागतिक पशुपैद्यकीय संमेलनात हे संशोधन मांडण्यात आले होते. एका कंपनीने जनावरांची लस बाजारात आणली. या लसीमुळे उद्भवणारे फायदे, तोटे हे उपलब्ध पर्यायी लसींच्या तुलनेने किती व कोणते आहेत यावर डॉ. सावंत यांनी संशोधन केले आहे. यासाठी डॉ. सावंत यांनी संपूर्ण भारतातून  2017 पासून संशोधनात्मक माहिती गोळा केली. प्रत्यक्ष प्राण्यांवर त्या लसीचा परिणाम किती होतो याचा गोषवारा जागतिक परिषदेकडे पाठवण्यात आला होता. मे 2019 मध्ये डॉ. सावंत यांच्या या संशोधनासाठी जागतिक संमेलनात सादरीकरणासाठी मान्यता देण्यात आली. नुकत्याच झालेल्या संमेलनात डॉ. सावंत यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करून संशोधन सादर केले. जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांनी या संशोधनाचे कौतुक केले. या संशोधनाकरिता चीनमधील डॉ. सी. के. माह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनही उच्च दर्जाची गुणवत्ता, चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीमुळे डॉ. सावंत यांनी या संशोधनातून जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here