पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके व जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा : मनसे

0

मुंबई : पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मराठी भाषेचा वापर न केल्यास मनसेचे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा बहुंताश भाग हा मुंबईमध्ये येतो. असे असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही. पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण यामध्ये सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांनुसार भाषाही वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही मराठी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. तसेच मराठी भाषेचा वापर न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here