पेट्रोल-डिझेल दरात सलग सहा दिवस वाढ

0

नवी दिल्‍ली : सौदी अरेबियातील सर्वांत मोठी तेल कंपनी अरामकोवर काही दिवसांपूर्वी ड्रोन हल्ला करण्यात आला होता. याचा परिणाम जगभरातील पेट्रोलच्‍या दरावर झाला आहे. भारतातील पेट्रोल दरावर देखील याचा परिणाम झाला आहे. सोमवारी दिल्ली पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली. यामुळे नोकरवर्गात असंतोष पाहायला मिळत आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता तेथे पेट्रोलचा दर 73.91 रुपये इतका झाला आहे. तर 18 पैशांनी डिझेलचे दर वाढल्यामुळे आता 66.74 रुपये इतका डिझेलचा दर झाला आहे. रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती.  यासोबतच पेट्रोलसोबतच डिझेलच्‍या दरात देखील १८ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेल प्रतीलीटर ६६.७४ रुपयांवर पोहोचले. सौदी अरेबियामध्ये झालेल्या तेल साठ्यावरील ड्रोन हल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पाच टक्के तेल कपात कमी झाले आहे. तर किंमतीत होणारी सततची वाढ यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. तज्‍ज्ञांच्‍या मते, कच्‍या तेलाच्‍या किंमती अशाच वाढत राहिल्‍या तर याचे परिणाम देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर होतील. 

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here