अंजनवेल येथील तिघांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

0

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथील तीन जणांवर ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद पवार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार महेंद्र पवार आपल्या चुलतभावासह रस्त्यावरुन जात होते. त्या रस्त्याजवळ गोरक्षनाथ गोपाळ बागवे, प्रतिक गोरक्षनाथ बागवे आणि प्रथमेश गोरक्षनाथ बागवे आपल्या जमीनीत जेसीबीने चर खोदत होते. पवार यांनी ते बागवे पितापुत्र काय करत आहेत हे पहात असताना गोरक्षनाथ बागवे व त्यांच्या मुलांनी जातिवाचक बोलून शिवीगाळही केली. या तक्रारीवरुन गोरक्षनाथ बागवे व त्याच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here