भारताचे माजी कसोटी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

0

मुंबई : भारताचे माजी कसोटी सलामीवीर माधव आपटे यांचे मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात सोमवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी 1950 च्या दशकात भारतीय संघाकडून सात कसोटी सामने खेळले. ते आपले आयुष्य आनंदाने जगले असे त्यांचा मुलगा वामन आपटे यांनी सांगितले. आपटे यांनी खेळलेल्या कसोटी सामन्यामध्ये 542 धावा केल्या. त्यामध्ये वेस्ट इंडिज विरुद्धची 1953 साली खेळलेली 163 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. त्यावेळी देखील वेस्टइंडिज संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी 67 प्रथम श्रेणी सामन्यामध्ये (46 रणजी सामने मुंबई आणि तीन बंगालकडून) त्यांनी 3336 धावा केल्या. त्यामध्ये सहा शतक आणि 16 अर्धशतजकांचा समावेश आहे. आपटे यांना दिग्गज फलंदाज विनू मंकड यांनी सलामीवीर म्हणून प्रस्थापित केले. यासोबतच अनेक वर्षे आपटे हे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि द लेजंड्स क्लबचे अध्यक्ष देखील होते. माधव आपटे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते. 

IMG-20220514-WA0009


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here