डॉ. आनंद आंबेकर यांच्या “परिचारिका” पुस्तकाचे जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा

0

रत्नागिरी : “रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका” डॉ.आनंद आंबेकर यांच्या पीएच.डी. संशोधनावर पुस्तक निर्मिती करण्यात आली, या पुस्तकाच्या सोहळ्यासाठी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून गेली नऊ वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉ. उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद आंबेकर यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 100 शासकीय आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिकांची मुलाखत घेऊन अध्ययन केले. संपुर्ण भारतातील सोळा विद्यापीठातील परिचारिका अभ्यासकांच्या पीएच.डी. अध्ययनाचा गोषवारा घेऊन सदर अध्ययन करताना ” भूमिका संघर्ष ” या प्रमुख संकल्पनेवर सदर अध्ययन केले. डॉ.आनंद आंबेकर यांनी प्रास्ताविक करताना आवर्जून सांगितले की तीन वर्षे फिल्ड वर्क करताना अनेक अनुभव सर्वासोबत सांगितले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंग आलेले सांगितले. डॉ.अलिमियाँ परकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले की, डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे समाजाभिमुख शिक्षणाला चालना मिळेल तसेच परिचारिका या माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या कणा आहेत असे आवर्जून सांगितले. रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोविड काळात परिचारिका समाजाच्या किती महत्वाचा घटक आहेत हे जगासमोर आले आहे, आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे परिचारिकाच्या आयुष्याला शास्त्रीय दृष्टीने पाहता येईल. माजी आमदार आणि यश फौंडेशन नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्चचे संस्थापक बाळासाहेब माने यांच्या रत्नागिरीतील पहिल्या नर्सिंग कॉलेजच्या चॅलेंजीग गोष्टी कथित केल्या आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाबद्दल आवर्जून उल्लेख केला. संगमेश्वरी रक्तामुळे जास्तीतजास्त सामाजिक भान आहे की काय असे मिश्किल व्यक्तव्य करत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.,अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थीदशेपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे आवर्जून उल्लेख केला. आत्मनिर्भर होण्यासाठी महिलेने संघटित होण्याची आणि समाजातील सर्वच क्षेत्रात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे यासाठी परिचारकाचा प्रत्यक्ष फिल्ड मधील डॉ.आनंद आंबेकर यांचे अध्ययन परिचारिका आत्मनिर्भर होण्यासाठी नक्की उपयोगी पडेल असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले. डॉ.आनंद आंबेकर गोगटे महाविद्यालयाच्या सर्वच आघाडीवर अग्रेसर असतात त्यांच्या ऊर्जेचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो असे जाणीवपूर्वक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी असे सांगितले की,विद्यापीठातील 800 कॉलेजचे समन्वयक म्हणून काम करताना डॉ.आनंद आंबेकर यांचे वेगळेपण कायम दिसत असते, आम्ही दोघे स्वतःच्या कॉलेज दशेपासून युवा महोत्सव मध्ये सक्रिय होती तिथं पासून त्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते. बिपीन बंदरकर,जयु भाटकर,डॉ.निधी पटवर्धन, रवींद्र केतकर, हेमंत पाडगावकर,बाळा पावसकर विशेष उपस्थित होते. पुस्तकाच्या सुबक मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल प्रा. शुभम पांचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ.आनंद आंबेकर यांचा महाराजा परिवार आणि 95 परिवार आवर्जून उपस्थित होता, अनेक आजी माजी विद्यार्थी आयोजकांच्या भूमिकेत असलेले दिसत होते, तसेच प्राध्यापक समूहाचा मनस्वी परिवार उपस्थित होता तसेच अनेक मित्र आणि आई चंद्रभागा, पत्नी गौरीं आणि परिवारातील सभासदांबरोबर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विणा लेले आणि मुग्धा सोहनी या आजी माजी मेट्रन आणि परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष स्नेहा बने आवर्जून उपस्थित होत्या. साक्षी कॅटर्स च्या साक्षी आंबेकर आणि स्वप्नील केळशिकर, साई मंगल कार्यालयाचे मंदार दळवी यांनी उत्तम सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा.आरती पोटफोडे यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ.आनंद आंबेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:41 PM 28-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here