आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेची यात्रा ६ मार्चला, कोरोनामुळे उत्सव साधेपणाने होणार

0

मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षिकोत्सव दि. ६ मार्च २०२१ रोजी होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यावर्षी मर्यादित स्वरूपात फक्त आंगणेकुटुंबिय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल, अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.

भाविकांच्या होणा-या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार व आपलं सांगण सांगावं, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 29-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here