मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी नोटीस बजावली. मात्र, यावरुन आता शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:56 PM 29-Dec-20