2021 साली होणारी जनगणना ही संपूर्णपणे डिजीटल पद्धतीने

0

नवी दिल्ली : देशात 2021 साली होणारी सोळावी जनगणना ही संपूर्णपणे डिजीटल पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार जनगणनेसाठी सुमारे 12 हजार कोटी रूपये खर्च करणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. जनगणना भवनाची पायाभरणी करताना ते बोलत होते. जनगणना भविष्यकालीन विकासाचा आराखडा तयार करण्याचा आधार असतो. त्यासाठी जनसहभागाची आवश्यकता असते. सन 2021 साली होणारी जनगणना ही सोळावी जनगणना असणार आहे. जनगणनेच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले असून यावेळी मोबाईल अ‍ॅपचा वापर जनगणनेसाठी करण्यात येणार आहे. डिजीटल पद्धतीचा वापर केल्याने अधिक बारकाईने जनगणना होईल. डिजीटल पद्धतीमुळे जनगणनेत आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते या सर्वांचा तपशील सुलभ पद्धतीने मिळणार आहे. त्यासाठी सरकार गंभीर असून जनगणनेसाठी 12 हजार कोटी रूपये खर्च करण्याची सरकारची योजना आहे, असे शहा यांनी सांगितले. जगगणनेच्या आधारे सरकार 22 योजनांची आखणी करणार असल्याचे शहा यांनी सांगितले. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना जनगणनेच्या आकडेवारीवरूनच आखण्यात आली, ती यशस्वी ठरत आहे. जनगणनेसाठी 16 भाषांचा वापर करण्यात येणार असून 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here