गोल्फ स्पर्धेत कपिल देव यांचे अजिंक्यपद

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अष्टपैलू कपिल देव निखंज यांनी गोल्फमध्येही आपले नाणे आता खणकवले आहे.एव्हीटी चॅम्पियन्स टूर गोल्फ टुर्नामेंटमध्ये 60 ते 64 वर्षे वयोगटात त्यांनी अजिंक्यपदाचा खिताब जिंकला आहे. सीमा सुरक्षा दलाचे पुष्पेंद्रसिंह राठोड यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक पटकावला. देशातल्या दहा शहरांतून शंभराहून अधिक गोल्फर या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारताला पहिल्यांदाच क्रिकेटचे जगज्जेतेपद 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात मिळाले होते. तो प्रसंग आणि गोल्फमधील विजेतेपद पटकावल्याचा आजचा प्रसंग याकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्‍नावर कपिल म्हणाले, आपण जिंकलो ही भावना छानच असते. ती आत्मविश्‍वास वाढवते. अर्थात देशासाठी विश्‍वचषक जिंकल्याची भावना काही औरच होती. आयोजनाचे कौतुक करताना ते म्हणाले, या स्पर्धेमुळे ज्येष्ठ गोल्फ खेळाडूंमध्ये या आयोजनाने स्पर्धेची भावना बळावलेली आहे. स्पर्धेचे पहिले सत्र मार्चमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये आयोजण्यात आले होते. दुसरे सत्र बंगळुरूत जूनमध्ये पार पडले. हे तिसरे सत्र होते. चौथे आणि अंतिम सत्र जानेवारी 2020 मध्ये कोलकात्यात खेळवले जाईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here