महात्मा गांधीजींनी वापरलेल्या वस्तूंचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

0

◼️ 2 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता

लंडन : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वापरलेल्या एक वाटी आणि चमचा याचा ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात 10 जानेवारीला या वस्तूंचा लिलाव होईल. या वस्तूंच्या सेटची एकत्रित किमंत 55 हजार ब्रिटीश पौंड ठेवण्यात आली आहे. लिलावाचे कमिशन, जीएसटी, विमा, भाडे आणि भारतीय कस्टम ड्युटी याचा विचार केल्यास भारतीय चलनात याची रक्कम 1 कोटी 20 लाखांवर जाते. ग्लोबल ऑनलाईन संस्थेच्या अंदाजानुसार महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तूची बोली 80 हजार ब्रिटीश पौंडांपर्यंत जाऊ शकते. भारतीय चलनात याची किंमत 2 कोटींपर्यंत जाईल. काही वेळा लिलावासाठी ठरवण्यात आलेल्या किमान रकमेच्या दोन पट किंवा तीन पट बोली लावली जाऊ शकते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:35 PM 30-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here