एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणार असून त्यानंतर चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडून संमती मिळाली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनीच पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले आहेत.भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आज 30 डिसेंबरला त्यांचा ईडी कार्यालयात हजर राहायचं होतं. परंतु मागील दोन दिवसांपासून खडसे यांचा ताप, सर्दी आणि खोकला जाणवत आहे. कोरोनाची लक्षणे असल्याने चाचणी केली असून अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवलं असून त्यांनी 14 दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:35 PM 30-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here